पिंपरी,दि.१९(punetoday9news):-  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने सांगवी व चिखली येथे विनापरवाना अवैधरित्या ऑनलाईन व्हिडीओ गेम पार्लरमधुन जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली. 

चिखलीतील साने चौक , कृष्ण कॉमप्लेक्स मध्ये तळमजल्यात गाळा क्र. १ मधील सुखकर्ता व्हिडीओ पार्लर ॲण्ड ऑनलाईन लॉटरी सेंटर गाळा क्र. २ मधील राजश्री व्हिडीओ गेम पार्लर ॲण्ड ऑनलाईन लॉटरी सेंटर गाळा क्र. ३ मधील बालाजी व्हिडीओ गेम पार्लर ॲण्ड ऑनलाईन लॉटरी सेंटरमध्ये ऑनलाईन जुगार खेळविला जात असल्याच्या माहितीवरुन छापा टाकुन आरोपींकडून एकुण २,५१,८२० / – चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  तर आरोपी पियुष धर्मेद्र राय , (वय २२ वर्षे , रा.केशवनगर , चिखली),  राजेश हनुमंत शेंडगे (वय २७ वर्षे रा . गणेश कॉलनी , पाटीलनगर , चिखली) , कैलास विष्णु उमाप (वय ३२ वर्षे रा . बादल वस्ती , मोईगांव ता . खेड)  व इतर ०७ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

 

तर सामाजिक सुरक्षा विभागाचे दुसऱ्या पथकाने  सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत सृष्टी चौकाजवळ , प्रभातनगर , पिंपळे गुरव येथील १ ) श्री ऑनलाईन लॉटरी सेंटर २ ) श्री व्हिडीओ गेम पार्लर ३ ) जय गणेश व्हिडीओ गेम पार्लर या तिन्ही लॉटरी सेंटरमध्ये पैशावर ऑनलाईन जुगार खेळविला जात असल्याच्या माहितीवरून छापा टाकुन  एकुण १,६२,४०० / – चा मुद्देमाल जप्त केला आहे.

तसेच आरोपी विजय विनायक खराडे (वय २९ वर्षे रा . पाटीलनगर , चिखली) संदिप आत्माराम जगताप ( वय २२ वर्षे रा. पिंपळे गुरव), प्रकाश राजाभाऊ कांबळे (वय २६ वर्षे रा. लक्ष्मी चौक , हिंजवडी) व इतर ०२  आरोपींविरुध्द सांगवी पोलीस स्टेशन मध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशा दोन्ही कारवाईमध्ये एकुण ४,१४,२२० / – किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त , रामनाथ पोकळे , पोलीस उप – आयुक्त , ( गुन्हे ) आनंद भोईटे , सहा . पोलीस आयुक्त , प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदिपसींग सिसोदे , धैर्यशिल सोळंके , विजय कांबळे , संतोष बर्गे , सुनिल  शिरसाट , संदीप गवारी , नितीन लोंढे , भगवंता मुठे , महेश बारकुले , गणेश कारोटे , अनिल महाजन , मारुती करचुंडे , विष्णु भारती , वैष्णवी गावडे , संगिता जाधव , राजेश कोकाटे , सोनाली माने , मारोतराव जाधव यांनी केली .

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!