१) वैद्यकीय महाविद्यालय २) पी.एम.सी – एम.ई.टि साठी बोधचिन्हांचे दोन नमुने विद्यार्थी – विद्यार्थीनी, इच्छुक व्यक्ती, संस्था यांच्याकडून मागविण्यात आले आहेत उत्कृष्ट बोधचिन्हास मिळणार ५ हजार रु.
पुणे,दि.२०( punetoday9news):- पुणे महानगरपालिकचे ‘ भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय ‘ हा महत्वकांशी प्रकल्प असून सदरचे वैद्यकीय महाविद्यालय डॉ . नायडू सांसर्गिक रुग्णालय , स्टेशन रोड या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. सदरचे वैद्यकीय महाविद्यालय चालविण्यासाठी पुणे महानगरपालिका -मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट ( पी.एम.सी – एम.ई.टि ) स्थापन करण्यात आले आहे.
या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रतिवर्ष १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे . भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या दैनंदिन व प्रशासकीय कामकाजाकरीता स्वत : चे बोधचिन्ह असणे आवश्यक आहे .१ ) वैद्यकीय महाविद्यालय २ ) पी.एम.सी – एम.ई.टि या करीता बोधचिन्हांचे दोन नमुने विद्यार्थी – विद्यार्थीनी , इच्छुक व्यक्ती , संस्था यांचेकडून मागविण्यात येत आहेत . मागविण्यात आलेल्या बोधचिन्हातून उत्कृष्ट बोधचिन्हांची निवड होणार असून हे बोध चिन्ह महाविद्यालयाच्या व ट्रस्ट च्या कामकाजाकरीता कायमस्वरुपी वापरात येणार आहे . हि एक अभिमानास्पद व गौरव शाली बाब असणार आहे . सदर बोधचिन्हामध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे छायाचित्र व पुणे महानगरपालिका – पुणे महागनरपालिका मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट च्या बोधचिन्हामध्ये ( PMC – MET ) च्या नावाचा समावेश करण्यात यावा . निवड करण्यात आलेल्या बोधचिन्हासाठी प्रथम पारितोषिक रक्कम रु . ५००० रु. व व्दितीय पारितोषिक रक्कम रु . २००० रु. देण्यात येणार आहे .
पुणे महापौरांच्या संकल्पनेतुन सदर विषय सुरु करण्यात आला असुन आवाहन करण्यात आले आहे की , इच्छुक विद्यार्थी – विद्यार्थीनी, व्यक्ती, संस्था यांनी ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाʼ करीता एक बोध चिन्ह व पुणे महानगरपालिका -मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट च्या कामकाजा करीता एक बोध चिन्ह असे दोन प्रकारचे चांगले बोधचिन्हाचे नमुने तयार करुन , bavmc@punecorporation.org वर पाठविण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed