मुंबई, दि.२०( punetoday9news):- महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सेवानिवृत्त उपसचिव अनिस शेख यांची ३ वर्षाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे.
या पदासाठी उपसचिव दर्जाचा मुस्लिम अधिकारी पात्र ठरतो. यासाठी वक्फ बोर्डासमोर संदेश तडवी आणि अनिस शेख यांची नावे आली होती. यापैकी तडवी यांनी या नियुक्तीस नकार दिला.
त्यामुळे उर्वरित उमेदवार अनिस शेख यांची नियुक्ती करण्यात आली. शासनाच्या मान्यतेनंतर या नियुक्तीसंदर्भातील अधिसूचना आज जारी करण्यात आली आहे.
Comments are closed