पिंपळे गुरव,दि.२०( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील सेवेन्थ डे ॲडव्हेन्टीस्ट तमिल चर्च तर्फे  ग्लोबल युथ डे वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

यावेळी तारा सोफोष धडफळे सेंटर, पिंपळे गुरव मधील अनाथ लहान मुलांना जीवनाश्यक वस्तू, धान्य व कपडे इत्यादी वस्तू सांगवी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर यांच्या हस्ते देण्यात आले.

त्यावेळी जॉन अब्राहम, कॅथरीन जसुराज , जॉईस अब्राहम , ग्लॅडीस अब्राहम , निकिता पिल्लाई , चेल्लीमा अब्राहम, संजीवनी पुराणिक व तारा सोफोष मधील अधिकारी,  कर्मचारी वर्ग उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जस्सू राज आय्य दुराई तर आभार प्रदर्शन कमला स्वामी यांनी केले .

 

Comments are closed

error: Content is protected !!