हिरेन मृत्यू प्रकरणात तपासाला गतीने पूर्ण केल्याची माहिती एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी फेसबुक द्वारे दिली आहे.  ते म्हणाले, –

“अति संवेदनशील मनसुख हिरेन मर्डर केस की गुत्थी सुलझी । मैं अपने पूरे ATS पुलिस फ़ोर्स के सभी साथियों को दिल से सैलूट करता हूं जिन्होंने पिछले कई दिनों से रात – दिन एक कर के इस केस में न्याय पूर्ण तरीके से परिणाम निकाला । ये केस मेरे पुलिस कैरियर का अब तक का सबसे जटिल केस में से एक रहा ।”

 

या मनसुख हिरेन प्रकरणात मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेला पोलीस विनायक शिंदे ( ५१ ) आणि बुकी असलेला नरेश गोर ( ३१ ) याला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे . त्यानंतर राज्याच्या एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्ट करून अत्यंत संवेदनशील मनसुख हिरेन खून प्रकरणातील गुंता सुटला असल्याची माहिती दिली आहे .

सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणातही हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे . त्यातच वाझे यांच्याविरोधात अनेक महत्त्वाचे ठोस पुरावे एटीएसच्या हाती लागले आहेत . सचिन वाझेंचा प्रथम दर्शनी हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा करण्यात येत आहे . एटीएसचे अधिकारी शिवदीप लांडे यांच्या खाली हा तपास सुरु असून अनेक जबाब देखील घेण्यात आले आहेत . कोर्टात एटीएसने तब्बल ४ पानांचा अहवाल दिला असून त्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत . NIA कोर्टातून सचिन वाझे यांचा ताबा मिळावा या करता एटीएसने ठाणे कोर्टातून परवानगी देखील मिळवली आहे .

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!