दिल्ली,दि.२२( punetoday9news):- मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आलेले ज्येष्ठ  अधिकारी परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांच्या वेळेवरच शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

‘‘परमबीर यांनी गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले, पण ते बदलीनंतरच का केले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिल्लीत येऊन गेल्यानंतर परमबीर यांनी आरोपांचे पत्र लिहिले आहे,’’ त्यामुळे परमबीर यांच्या आरोपांमागील हेतूंबाबत शंका उपस्थित होत आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले निलंबित साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटींची हप्तेवसुली करण्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केला. या पत्राचा संदर्भ देत शरद पवार म्हणाले की, परमबीर यांनी दावा केलेले १०० कोटी नेमके कोणाला मिळाले, त्याचा तपशील त्यांनी पत्रात दिलेला नाही.

परमबीर यांनी पवारांच्या भेटीदरम्यान प्रत्यक्ष हप्तेवसुली झाली का? ते गृहमंत्री किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिले का? याबाबत या भेटीत त्यांनी काहीही सांगितले नाही, असेही पवार म्हणाले.

तसेच महाराष्ट्रातील सरकार स्थिर असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!