• आयपीएस रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप ; परवानगी एकाची टॅपिंग भलतेच?

 

मुंबई,दि.२४( punetoday9news):- महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले असुन रश्मी शुक्ला यांनी वेगळ्याच नावांनी फोन टॅपिंगच्या परवानग्या घेऊन अनेक मंत्र्यांचे फोन टॅप केल्याचा धक्कादायक आरोप आव्हाड यांनी केला आहे .

रश्मी शुक्ला यांनी परवानगी एकाच्या नावाने घेतली आणि फोन टॅपिंग दुसऱ्या लोकांचे केले आहे . त्यांनी त्यांच्या कार्यकाळात हे सर्व प्रकार केले आहेत . त्याचा उपयोग आता महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विरुद्ध होत आहे . फोन टॅपिंग करणे हा मोठा गुन्हा आहे. जर फोन टॅपिंग करायचे असेल तर संबंधित व्यक्तीची सविस्तर माहिती ज्यात नाव , नंबर दिला गेला पाहिजे , मात्र इथे  परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार झाला असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे  . ” केंद्र सरकारने काही नियम दिले आहेत . त्यात कोणत्या प्रकारात फोन टॅप करता येतात याविषयी सांगण्यात आले आहे . यात राष्ट्र घातक कृत्य , परकीय देशातील अतिरेकी संघटनेशी संबंध या प्रकारांशिवाय इतर परिस्थितीत फोन टॅपिंग करता येत नाही . याला अपवाद येथील शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीचा फोन टॅप करु शकतो . त्यामुळे रश्मि शुक्ला यांनी जी कारणे दिली होती ती संयुक्तिक नव्हती . त्यांनी ज्या फोन टॅपिंगच्या परवानग्या घेतल्या त्या चुकीच्या नावाने घेतल्या होत्या . परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार करण्यात आला . यात अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले . हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे . हे अनेकवेळा करण्यात आला आहे .

या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा इशाराही दिला आहे. ते म्हणाले , ” कोणाचाही फोन टॅप करायचा असेल तर त्याला गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची परवानगी आवश्यक असते . रश्मी शुक्ला यांनी अशा प्रकारची परवानगी गेतली होती का ? त्याचे उत्तर सिताराम कुंटे यांनी नाही असे दिले आहे. त्यामुळे आता पुढे काय कारवाई होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!