• नागरिकांनो आता तरी नियम पाळा अन्यथा……
• केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांची पत्रकार परिषद.
पुणे,दि.२४ ( punetoday9news):- महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या जास्त आहे. असे राजेश भूषण यांनी यावेळी सांगितले.तसेच देशात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात असल्याने सर्वांच्या चिंतेत भर घालणारी बाब आहे.
तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरातील आजची कोरोना रूग्णांची संख्या पाहता १८६५ रूग्णांची नोंद झाली आहे.
तर पुणे शहरात आज तब्बल ३५०९ नवीन रूग्णांची नोंद झाली आहे .
पुणे:-
पिंपरी-चिंचवड:-
त्यामुळे वाढती आकडेवारी पाहता नागरिकांची चिंता वाढवणारी बाब आहे.
पुन्हा लाॅकडाउन नको म्हणणाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग चे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याची गरज आहे. व्यवसाय टिकायला हवेच पण आपला व्यवसाय चालवताना नियमांचे पालन होणे गरजेचे आहे.
Comments are closed