पिंपरी,दि.२५ (punetoday9news):- अवैधरित्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाने तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या कारवाईत डंपरसह 12 लाख 44 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला . नितीन गोरख वेताळ ( वय 33 , रा . मोहननगर , चिंचवड ) आणि त्याचे इतर दोन साथीदार यांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , प्राधिकरण निगडी येथून एक डंपर अवैधरित्या वाळू घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून एक डंपर ( एम एच 12 / जी टी 8267 ) अडवला .असता त्यात चार ब्रास वाळू आढळून आली. त्याबाबत चौकशी केली असता ही वाळू अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला . पोलिसांनी 32 हजारांची चार ब्रास वाळू , 12 लाखांचा एक डंपर , 12 हजरांचा एक मोबाईल फोन आणि 710 रुपये रोख रक्कम असा एकूण 12 लाख 44 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . निगडी पोलीस तपास करीत आहेत .

 

 

Comments are closed

error: Content is protected !!