पुणे,दि.२६ (punetoday9news):- जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पुणे जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत तसेच जैवविविधता पूरक गाव संकल्पनेबाबत आणि कोरोना प्रतिबंधक जनजागृती बाबत एलईडी मोबाईल व्हॅन (फिरता चित्ररथ) द्वारे प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या मोबाईल व्हॅन द्वारे प्रसिद्धी कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते झाला.


जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे, माहिती विभागाचे प्रभारी उपसंचालक तथा जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, माहिती अधिकारी वृषाली पाटील तसेच विलास कसबे, संजय गायकवाड, चंद्रकांत खंडागळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!