पिंपळे गुरव,दि.२६( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे डायनासोर गार्डन शेजारील मधील पंजाब नॅशनल बँकेच्या समोरील पाटील प्लाझा इमारतीच्या तळमजल्यातील पार्किंगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामध्ये दोन दुचाकी वाहने पेट घेत असताना सांगवी पोलिसांनी तत्परता दाखवत  दुचाकींवर पाणी टाकून आग विझविली तसेच इतर वाहने आगीपासून दूर काढली  त्यामुळे मोठा अनर्थ टळला . तसेच तत्परतेने घटनास्थळी रहटणी येथील अग्निशामक दल उपस्थित झाल्याने मोठी जीवितहानी टळली.


यावेळी स्थानिक नगरसेवक शशिकांत कदम यांनी अग्निशामक दलाला संपर्क करून घटनेची माहिती दिली. एमएसईबीचे कर्मचारी ज्योतिराम कापसे, संतोष सरजे यांनी सर्व प्रथम इमारतीचा फिडर बंद केला.

याप्रसंगी नगरसेवक शशिकांत कदम, सांगवी पोलीस नाईक संतोष गवारी, गणेश बोऱ्हाडे, अक्षय भोसले, सुुुधीर काटे, रहाटणी अग्निशामक दलाचे सिनियर फायरमन विठ्ठल घुसे, एम.जी. बर्वे, अक्षय गायकवाड, सुशीलकुमार राणे, मंगेश देवगडकर या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. घटनास्थळी एकूण इलेक्ट्रॉनिक मीटरचे एकूण १२ बॉक्स जळून खाक झाल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले.

घटनास्थळी आग लागल्याचे समजताच इमारतीमधील फ्लॅट धारक रस्त्यावर आले. मुख्य रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले. तसेच आलेल्या अग्निशमन दलाचा अग्निशामक बंब हा आगीवर पाणी फवारत असताना बंबाच्या इतर पाईप व्हाॅल्व मधून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडू लागल्याने या अग्निशामक बंबाच्या आजारी स्थितीची चर्चा नागरिकांच्यात झाल्याचे पहायला मिळाले.

त्यामुळे एकीकडे प्रेशरने आग विझवताना दुसरीकडे गळती होत असेल तर मोठ्या आपत्तीं वेळी अग्निशमन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्य करेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!