• महात्मा फुले यांच्या विषयी वापरले अपशब्द. 

• सर्व स्तरातून सोशल मिडिया वर निषेध व्यक्त. 

• स्पर्धा परीक्षेचे ज्ञानदान की महापुरूषांविरूध्द कटकारस्थान?

 

पुणे,दि २६(punetoday9news):- पुणे शहरातील लोकसेवा ॲकॅडमीच्या एका शिक्षकाने स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवताना  महात्मा फुले यांच्या विषयी अपशब्द वापरला असल्याने पुणे शहरासहित संपूर्ण राज्यभरातून या शिक्षकाच्या कृत्याचा व वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. 

ऑनलाईन लेक्चर युट्युबवर अपलोड केल्यानंतर  सोशल मिडिया वर आपले वक्तव्य प्रचंड वायरल झाल्यानंतर संबंधित शिक्षक आप्पा हातनुरे याने कारवाईच्या भितीने आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. मात्र एका शिक्षकाने असे वक्तव्य,  कृत्य करणे ही पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने लाजिरवाणी बाब आहे. तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जाब विचारला असता त्यांनाही शिवीगाळ केला असल्याची माहिती समोर आली आहे.

अनेक वेळा अभिनेते प्रसिद्धी साठी महापुरूषांच्या नावाचा गैरवापर करताना आढळून येतात मात्र इथे ज्या महापुरूषाने आपले सर्वस्व शिक्षण क्षेत्रास दिले अशा महात्मा फुले यांच्या विषयी शिक्षकाने अपशब्द जाणीवपूर्वक वापरणे व प्रसिद्धी मिळवणे ही शरमेची बाब आहे. प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संबंधित ॲकॅडमीच्या वेबसाईट व युट्युबवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क केला असता सर्व क्रमांक बंद केल्याचे निदर्शनास आले आहे.

याचा सोशल मिडिया वर तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे तसेच या शिक्षक व लोकसेवा ॲकॅडमीच्या विरुद्ध शासनाने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!