पिंपरी: –
कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीत धनगर समाजातील अनेक मेंढपाळ कुटुंबांना मदतीची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया धनगर महासंघ (दिल्ली) च्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या हस्ते व मार्गदर्शनाखाली गरजू कुटुंबांना अन्नधान्य, तसेच दैनंदिन व्यवहारातील उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
          सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू मेंढपाळाना अन्नधान्य वाटप करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील बारामती, वालचंदनगर, इंदापूर, अकलूज, बावडा, यवत या भागातील मेंढपाळ समाज बांधवाना अन्नधान्य व जीवनावश्यक किटचे वाटप ऑल इंडिया धनगर महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बंडू मारकड पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या तीन महिन्यापासून काम बंद असल्याने अनेकजनांंच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाला पळवून लावण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे. खारीचा वाटा म्हणून भुकेल्या नागरिकांना साहाय्य करावे, असे आवाहनही बंडू मारकड पाटील यांनी केले आहे.
          यावेळी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सचिन कोपणर, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सुनील बनसोडे, माध्यमप्रमुख महावीर काळे, पुणे जिल्हा युवकाध्यक्ष हिराचंद गाडेकर, पुणे जिल्हा उपप्रमुख नागन्नाथ वायकुळे, हवेली तालुकाध्यक्ष तानाजी कोपनर, पिंपरी-चिंचवड संपर्कप्रमुख नानासाहेब सोट, पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष सतिश पाटील, पिंपरी चिंचवड युवकाध्यक्ष संतोष पांढरे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष बिभिषण घोडके, पुणे जिल्हा सोशल मिडिया प्रमुख सागर मारकड, सोलापुर अतिप्रभारी संजय नायकुडे, हवेली ता.संपर्कप्रमुख संभाजी यमगर, हवेली तालुका युवाध्यक्ष किरण ठेंगल, सचिन सलगर, काका मारकड, शहाजी मारकड, नितीन कोपनर, किशोर शिंदे आदी उपस्थित होते.


#

Comments are closed

error: Content is protected !!