मुंबई, दि.२८(punetoday9news):- राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून , या स्थितीमुळे बेड्स , व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र आहे . या परिस्थितीवर तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आज टास्क फोर्सची बैठक पार पडली .
या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत . निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली . विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयात अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घाला तसेच खासगी कार्यालये व आस्थापना ५० टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या.
बैठकीतील निर्णय
मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे . त्याची कार्यपद्धती ( एसओपी ) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी . जेणे करून नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल . ऑक्सिजनची महत्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर द्यावा. पुढे जाऊन रूग्ण वाढू शकतील त्यामुळे ई आयसीयू , व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी विशेषत : वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावे.
Comments are closed