पिंपरी,दि.२९ (punetoday9news):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना रविवारी ( दि . 28 ) रात्री चिंचवड गावात घडली .
प्रसन्न चिंचवडे असे गोळी लागून मृत्यू झाल्याचे नाव आहे . मिळालेल्या माहितीनुसार , चिंचवड वाल्हेकरवाडी चिंचवडे यांचा बंगला आहे. चिंचवडे यांचे एकत्र कुटुंब आहे. सर्वजणांनी रात्रीचे जेवण एकत्र केले आणि त्यानंतर प्रसन्न वरच्या मजल्यावर गेला. प्रसन्न याने त्याच्या वडिलांच्या पिस्तूलातून स्वतःवर गोळी झाडून घेतली. साडेनऊ च्या सुमारास ही घटना झाल्याचे सांगण्यात येते.
तत्काळ त्याला बिर्ला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले .प्रसन्न चिंचवडे यांनी गोळी झाडून घेण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही . प्रसन्न हा भाजप नगरसेविका करुणा चिंचवडे यांचा मुलगा आहे .
Comments are closed