• शरद पवार सध्या उपचारासाठी हाॅस्पिटलमध्ये असल्याने तात्पुरता प्रकरणावर पडदा ; पण इतर नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता. 

• इतर नेत्यांमध्ये शाब्दिक धुलवड चालूच.

मुंबई,दि.२९( punetoday9news):- महाराष्ट्रातील राजकारणात सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षातील नेत्यांच्या आरोपांच्या फैलीवर फैली चालू असताना शरद पवार व अमित शहा यांच्या भेटीच्या वृत्ताने महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. शरद पवार हे नेहमीच राजकारणात नवीन डावपेच वापरतात त्यामुळे त्यांच्या डावपेचांचा अंदाज बांधने हे विरोधी पक्षातील नेत्यांना अवघड असते. राष्ट्रवादी काँग्रेस कडून अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा मिळाला नसला तरी या भेटीची शक्यता नाकारता येत नाही. 

सचिन वाझे प्रकरणाचे पडसाद थेट दिल्लीत उमटत आहेत. त्यातच महाविकास आघाडी जन्माला घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानानंतर संशयकल्लोळ अजूनच वाढला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली. ही भेट गुपित ठेवली जात आहे.

एका गुजराती दैनिकाने ही बातमी दिली आहे. त्यावरून तर्क-वितर्क काढले जात आहेत. अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर पवार-शाह भेट झाल्याचे एका गुजराती दैनिकाने वृत्त दिलंय.

राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. ते म्हणाले, “शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. पवार-शाह भेट हे भाजपचं षडयंत्र आहे. ती बातमी म्हणजे निव्वळ अफवा आहे,”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मात्र ही बातमी फेटालेली नसल्याने महाराष्ट्रातील राजकारणात नवीन घडामोडी पहायला मिळतील असे सूचक वक्तव्य असल्याचे तर्क मानले जात आहेत.  पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “सगळ्याच गोष्टी सार्वजनिक करता येत नाहीत.” आता शाह यांचीच संशय वाढवणारी प्रतिक्रिया आल्याने चर्चेला प्रचंड उधाण आले आहे.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!