पुणे, दि. 29( punetoday9news):-  पुणे विभागातील 6 लाख 55 हजार 359 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 लाख 41 हजार 964 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 69 हजार 482 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 17 हजार 123 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.31 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 88.33 टक्के आहे.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 5 लाख 14 हजार 639 रुग्णांपैकी 4 लाख 45 हजार 942 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 58 हजार 947 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 750 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.89 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.65 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 64 हजार 515 रुग्णांपैकी 59 हजार 543 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 85 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 887 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 60 हजार 17 रुग्णांपैकी 53 हजार 165 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 920 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 932 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 987 रुग्णांपैकी 47 हजार 412 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 787 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 788 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 806 रुग्णांपैकी 49 हजार 297 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 743 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 766 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 9 हजार 627 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 8 हजार 292, सातारा जिल्ह्यात 407, सोलापूर जिल्ह्यात 601, सांगली जिल्ह्यात 234 तर कोल्हापूर जिल्ह्यात 93 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 4 हजार 616 आहे. पुणे जिल्हयामध्ये 4 हजार 158, सातारा जिल्हयामध्ये 186, सोलापूर जिल्हयामध्ये 150, सांगली जिल्हयामध्ये 60 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 62 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 47 लाख 97 हजार 425 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 7 लाख 41 हजार 964 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

#

Comments are closed

error: Content is protected !!