पिंपरी,दि.३०( punetoday9news):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे , सेक्टर क्र .२३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे व शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरूवार दि .०१ / ०४ / २०२१ रोजी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे . दि .०१ / ०४ / २०२१ रोजी म.न.पा. मार्फत होणारा सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल .

त्यानंतर दुरूस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही . दुरूस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवलेमुळे शहरातील सर्व भागात दुस – या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि .०२ / ०४ / २०२१ रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे . तरी नागरिकांनी म.न.पा. कडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करुन म.न.पा.स सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!