भोसरी,दि.३१( punetoday9news):- जैन गुरु आचार्य भगवंत श्री आनंदऋषीजी म. सा. यांच्या २९ व्या पुण्यतिथि निमित्त भोसरी येथील आनंद युवा मंच व गौ़तमनिधि फौंडेशन यांच्या वतीने अन्नदाना़चा उपक्रम राबवण्यात आला . कोरोनाच्या पार्श्वभूमी वर व ज्यांना या परस्थिथी मध्ये अन्न धान्याची अत्यंत निकड आहे अशा जवळपासच्या परिसरातील अनाथालय, वृद्धाश्रम, गरजुंना हे अन्नधान्य़ वितरित करण्यात आले.
श्री जैन संघ भोसरी च्या तत्वावधानामधे हा उपक्रम राबवताना डिजीटल मिडिया द्वारे या अन्नदाना बद्दल आवाहन करण्यात आले होते. व त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. भोसरी श्री जैन संघाचे सदस्य , चिंचवड ,निगडी, औंध, येरवडा, पिंपरी मधील जैन बांधवांनी ही यात सहभाग घेत दान स्वरुपात धान्य सामग्री दिली.
दापोडी येथील सरस्वती अनाथालय, देहुगांव येथील वात्सल्य अनाथालय,कामशेत येथील किनारा वृद्धाश्रम, दौंड येथील अविश्री बाल सदन,आळंदी येथील भागवत सेवा समिति, व भोसरी मधील उर्जा प्रप्तिष्ठान यांना ही सामग्री वितरित करण्यात आली.
सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन आनंद युवा मंच व गौतमनिधी फौंडेशन ही दरवर्षी भगवान महावीर जन्म कल्याणक दिवशी रक्तदान व ईतर वेळी संतसेवा वगैरे सारखे उपक्रम राबविते.
या वर्षीही 25 एप्रिल 2021रोजी भ. महावीर जन्मकल्याणक च्या दिवशी रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे.
यावेळी आनंद युवा मंच व गौतमनिधी फौंडेशन च्या सर्व सहकार्यांनी उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांची कृतज्ञता व आभार मानले.
Comments are closed