पिंपळे गुरव,दि.३१( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघातर्फे नियमित पणे वर्षभर सभासदांसाठी विविध कार्यक्रम घेतले जातात मात्र पुन्हा वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सभासदांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
शासनच्या वतीने नियमावली जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यालय दि.२१ एप्रिल पर्यत बंद राहणार आहे त्यानंतर परिस्थिती पाहून पुढील कामकाजाचे नियोजन सांगण्यात येईल असे , तशी सुचना संस्थेचे नोटिस बोर्डावर लावली जाईल असे सचिव जालंदर दाते यांनी सांगितले आहे.
Comments are closed