पिंपरी,दि.३१( punetoday9news):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने गुटखा मालाची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करत १२ लाखांचा गुटखा ताब्यात घेतला आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये बातमीदाराकडुन गुटखा विक्रीच्या हेतुने मुंबई हून गाडी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दि. ३० रोजी आरोपी करम होशीयतअली शेख (वय २९ वर्षे , रा.कामन रोड, भिवंडी, ठाणे) त्याची महिन्द्रा पिकअप बोलेरो (एमएच ४७ एएस १४८१) चारचाकी शिरगाव पोलीस चौकी हद्दीत सोमाटणे फाटा सबवे दरम्यान सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडून १ ) १२.३०.५६० / – रु किं . चा विविध कंपनीचा गुटखा २ ) ३३०० / – रुपये रोख रक्कम ३ ) ५०० / – रु.किं.चा सॅमसंग कंपनीचा साधा मोबाईल ४ ) ८,२०,००० / – रु.कि.ची एक महिन्द्रा बोलेरो पिकअप असा एकुण २०,५४,३६० / – रु . किं . चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीविरुध्द शिरगाव पोलीस चौकी येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास शिरगाव पोलीस चौकी करीत आहे .
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त,( गुन्हे ) आनंद भोईटे, सहा.पोलीस आयुक्त, प्रशांत अमृतकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे , पोलीस अंमलदार विजय कांबळे , सुनिल शिरसाट , संतोष बर्गे , नितीन लोंढे , भगवंता मुठे , मारुती करचुंडे , अनिल महाजन , गणेश कारोटे , राजेश कोकाटे , सोनाली माने यांनी केली.
Comments are closed