पिंपरी,दि १(punetoday9news):- पिंपरी चिंचवड पोलीस आस्थापनेवरील नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा बुधवारी सेवानिवृत्ती निरोप समारंभ पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणात सेवानिवृत्ती समारंभ सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करून घेण्यात आला. यावेळी रामचंद्र शिवाजी जाधव , (सहायक पोलीस आयुक्त , चाकण विभाग) गणेश बाबुराव ठाकरे ( सहा . पोलीस उप – निरीक्षक नेमणुक अतिक्रमण विभाग म.न.पा.) संजय नारायण भालेराव (सहा. पोलीस उप निरीक्षक, सांगवी पोलीस स्टेशन) किशोर बन्सीलाल शिंपी (सहा . पोलीस उप – निरीक्षक, वाकड पोलीस स्टेशन) हे नियत वयोमानानुसार पोलीस दलातुन सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
रामचंद्र जाधव (सहायक पोलीस आयुक्त , चाकण विभाग) १९८८ साली महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले असून त्यांना सेवेच्या संपुर्ण कार्यकाळामध्ये दोनवेळा राष्ट्रपती पदकाने सन्मानीत करण्यात आले असून पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह मिळाले आहे .
गणेश ठाकरे ( सहा. पोलीस उप – निरीक्षक) १९८५ साली पोलीस दलात भरती झाले असून त्यांना संपुर्ण सेवा काळात उत्कृष्ठ कर्तव्य बजावल्या बद्दल वरिष्ठांकडून एकूण ९५ बक्षिसे मिळाली आहेत .
संजय भालेराव (सहा . पोलीस उप – निरीक्षक) १९८६ साली पोलीस दलात भरती झाले असून त्यांना संपुर्ण सेवा काळात उत्कृष्ठ कर्तव्य बजावल्या बद्दल वरिष्ठांकडून एकूण १४० बक्षिसे मिळाली आहेत
किशोर शिंपी (सहा . पोलीस उप – निरीक्षक) १९८६ साली पोलीस दलात भरती झाले असून त्यांना उत्कृष्ठ कर्तव्य बजावल्या बद्दल वरिष्ठांकडून एकूण १४० बक्षिसे मिळाली आहेत .
यावेळी कार्यक्रमात बोलताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “तुम्ही निवृत्त झाले नाहीत. समाजामध्ये व पोलीस दलासाठी तुम्ही नेहमी पोलीसच राहणार आहात . पोलीस दलात येवून कर्तव्य बजावणे ही एक अभिमानाचीच बाब आहे . पोलीस आयुक्तालयात केव्हाही आपले स्वागतच असेल . कोरोना संसर्गाच्या कठीण काळात समाजासाठी आपण दिलेले मोलाचे योगदान नक्कीच कौतुकास्पद आहे.”
अशा शब्दांत पोलीस आयुक्त सक्तार मुर्तीचे कौतुक केले तसेच इतर उपस्थित पोलीस अधिकारी यांनी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या .
यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, रामनाथ पोकळे अप्पर पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , आनंद भोईटे पोलीस उप – आयुक्त , मुख्यालय , डॉ . प्रशांत अमृतकर सहायक पोलीस आयुक्त , गुन्हे -१ , प्रेरणा कट्टे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -२ , नंदकिशोर भोसले – पाटील सहायक पोलीस आयुक्त , विशेष शाखा . राजेंद्र निकाळजे पोलीस निरीक्षक , कल्याण शाखा उपस्थित होते.
Comments are closed