मुंबई, दि. 1( punetoday9news):- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2020 साठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी आर्थिक सहाय योजना पुढीलप्रमाणे आहे.
योजनेचे स्वरूप:-
पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. 25,000/- आर्थिक सहाय्य बार्टी मार्फत दिले जाईल.
पात्रता :-
1. उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.
2. उमेदवार संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा-2020 करिता पात्र असावा.
अर्ज करण्यासाठी-
1. बार्टीच्या संकेतस्थळावरील फॉर्म भरावा.
2. अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, DAF, उमेदवारांचे बँक खाते क्र. (पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत) व त्यासोबत संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 चे प्रवेश पत्र (Admit Card) इ. च्या स्व-साक्षांकित प्रती अपलोड कराव्यात. कागदपत्र स्व-साक्षांकित असणे बंधनकारक आहे.
3. फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक- दि. 20 एप्रिल 2021. पात्र उमेदवारांनी अधिक माहिती साठी ०२०-२६३४ ३६00/२६३३ ३३३९ येथे संपर्क साधावा.
फॉर्म करण्यासाठी लिंक- http://barti.maharashtra.gov.in> NOTICE BOARD> BARTI-UPSC-Civil Services Personality Test 2020 Online Application Form
“बार्टी मार्फत पात्र विद्यार्थ्यांसाठी Mock Interview घेतले जाईल. याबाबत सविस्तर सूचना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल,” असे बार्टीमार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे
Comments are closed