पुणे, दि. 2(punetoday9news):-

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:- 

पुण्यात सर्वाधिक चाचण्या केल्या जात आहेत . आणखी चाचण्या वाढवणार आहोत . आरोग्य सुविधा वाढवणार आहोत . बेड्स वाढवत आहोत .

• 5 एप्रिल पर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक बेडस वाढवणार . केस वाढल्या तर काही रुग्णालये केवळ कोव्हिड उपचारासाठी ठेवणार .

• जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील अधिक आहे . गेल्या 10 दिवसात राज्यात सर्वाधिक लसीकरण पुण्यात झाले . याला अधिक गती देणार.

• पुढील 2 दिवसात प्रत्येक दिवशी 75 हजारांच्या पेक्षा जास्त नागरिकांना लस देण्याचा प्रयत्न . 18 वर्षांवरील नागरिकांना पुढील 100 दिवसांमध्ये लस देण्याचा प्रयत्न .

अशी असेल संचारबंदी.

सायं ६ ते सकाळ ६ पर्यंत संचारबंदी.

संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार.

मार्केट यार्डात नियम पालन करून चालू .

शाळा आणि महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंदच .

मात्र , परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ( पीएमपीएल ) बसेस पुढील सात दिवस बंद .

एसटी सेवा सुरू राहणार.

हॉटेल , रेस्टॉरंट , बार , मॉल आणि चित्रपटगृहे बंद राहणार .

हॉटेलमधून पार्सल सेवा सुरू राहणार.

उद्योग किंवा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी बसेसची स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या जाणार. ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे.

 

संचारबंदीच्या काळात खासगी कार्यालयांमधून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित कंपन्यांनी त्याबाबतचे पत्र दिले असेल तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.

विवाह समारंभ ५० लोकांच्या उपस्थितीत , तर अंत्यविधी २० लोकांच्या उपस्थितीत होणार.

उद्याने ही पूर्वीप्रमाणे सकाळी सुरू राहणार.

राजकीय , सांस्कृतिक , सार्वजनिक , धार्मिक कार्यक्रमांना बंदी.

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!