मुंबई, दि.३( punetoday9news):- महाराष्ट्र राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे आहे याविषयीची माहिती शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केली आहे.
गतवर्षी दिवाळी पर्यंत झालेल्या परीक्षेच्या आधारे व अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना पास करण्यात आले होते मात्र यंदा प्रत्यक्ष शाळाच होऊ न शकल्याने ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांनी विविध प्रयत्न करून शिक्षण चालू ठेवून बहुतांशी मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवले मात्र काही ठिकाणी तंत्रज्ञानाच्या कमतरतेने अथवा अन्य कारणांनी मुलांपर्यंत शिक्षण प्रभावीपणे पोहोचू शकले नसल्याचेही मत यावेळी वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले तसेच यावर्षी शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.
कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, इ. १ ली ते इ. ८ वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता सर्वांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याचप्रमाणे इ. ९ वी आणि इ. ११ वीच्या विषयीसंबंधी निर्णय लवकरच घेण्यात येईल. pic.twitter.com/HDVdrPdxyu
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 3, 2021
https://www.facebook.com/watch/?v=481327629687132
Comments are closed