सचिन वाझे प्रकरणात नवीन वळण, सीबीआय चौकशी होणार.
मुुंबई,दि.५( punetoday9news):- परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटींच्या आरोपांची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती आणि त्यांना मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात सांगितले होते. उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली. त्यावर आज सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने सीबीआयला 15 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गृहमंत्री देशमुख यांच्यावर राजीनाम्याबाबत दबाव वाढला.
अनिल देशमुख हे गृहमंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सादर केला असल्याची अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवर मोठी नामुष्की ओढावली आहे. महाविकास आघाडी सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत- फडणवीस
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले , की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे . सीबीआय चौकशी लागल्याने अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदावर राहणे योग्य नाही . चौकशीतून ते निर्दोष बाहेर पडले , तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेता येईल .
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना फडणवीस म्हणाले , की हफ्ते वसुलीचे काम सरकारमधील मंत्र्यांच्या आशीर्वादाने होत होतं . सीबीआय चौकशीत सगळे समोर येईल . सीबीआय चौकशी होऊ नये , यासाठी अनेकांनी प्रयत्न केले . रश्मी शुक्ला यांचा अहवाल , परमबीर सिंग यांचे पत्रच कसे खोटे आहे , हेही भासवण्याचा प्रयत्न केला .
Comments are closed