पिंपरी,दि.६(punetoday9news):-  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा दोन लाख कोविड १९ लसीकरणाचा टप्पा पुर्ण झाल्याची माहिती वैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. 

” केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांनुसार कोविड -१९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड -१९ लसीकरण कार्यक्रम दि .१६ जानेवारी २०२१ पासून राबविण्यात येत आहे .

नोंदणी कृत आरोग्य सेवा देणारे व फ्रंन्ट लाईन वर्कर , वय वर्ष ४५ वरील व्यक्ती यांचे लसीकरण करण्यात येत आहे . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ५८ व २९ खाजगी लसीकरण केंद्रांवर दि .१६ जानेवारी २०२१ ते ६ एप्रिल  पर्यंत २,०८,७९५ नागरीकांना लसीकरण करण्यात आलेले आहे .

तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे की , पिंपरी चिंचवड शहरामधील वय वर्ष ४५ वरील नागरिकांनी महानगरपालिकेच्या नजीकच्या कोविड लसीकरण केंद्रावर लसीकरण करुन घ्यावे . तसेच कोविड -१९ प्रसार रोखण्यासाठी लसीकरण केल्यानंतर मास्क , सॅनिटायझर चा वापर व सामाजिक अंतर या गोष्टी पाळणे बंधनकारक आहे .

 

 

Comments are closed

error: Content is protected !!