पिंपरी,दि.८.( punetoday9news):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांचे वतीने शहरातील सर्व नागरिकांनी कोरोना संसर्ग कालावधी जोपर्यंत पुर्णतः आटोक्यात येत नाही तोपर्यंत सहकार्याची भुमिका ठेवुन कार्यालयात येण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे .

जर पोलीस आयुक्त यांची भेट घेणे अत्यावश्यक असेल तरच शासनाने घालून दिलेल्या नियम , अटी व शर्तीचे योग्य ते पालन करून नागरिकांनी नियोजित वेळ घेवुन भेट घ्यावी किंवा ज्या नागरिकांच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असल्यास त्यांनी त्यांचा अर्ज लेखी स्वरूपात पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड यांचे नावे करून या कार्यालयास पाठवावा .

तसेच पोलीस अधिकारी, अंमलदार हे कोणत्याही प्रकारे नागरिकांकडून त्यांचे कामासाठी पैशाची मागणी करित असल्यास किंवा त्यांचे मोबाईल संभाषण होत असल्यास त्यांचे मोबाईलची रेकॉडींग करावे तसेच व्हॉट्सॲप व्दारे कॉल करत असल्यास अशा व्हॉट्सॲप कॉलचे दूसऱ्या मोबाईलच्या साहाय्याने रेकॉर्डिंग करून पाठवावे . अशा पोलीस अधिकारी,अंमलदार यांचेवर योग्य ती कारवाई करण्यात येईल .

पिंपरी चिंचवड शहराला अवैध धंदे मुक्त करण्यासाठी पोलीसांप्रमाणे एक जबाबदार नागरीक म्हणून नागरिकांच्या सहभागाची अपेक्षा आहे . तरी नागरिकांना अवैध धंद्याबाबत व इतर कोणत्याही प्रकारची काही तक्रार असल्यास पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे मोबाईल नंबर ९१३४४२४२४२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!