• घरी स्वतंत्र खोली , स्वतंत्र प्रसाधन गृह, शौचालय उपलब्ध नसेल तर अशा रूग्णांना पुणे मनपाच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये आपला कोव्हीड टेस्टचा रिपोर्ट दाखवून दाखल होता येईल.
पुणे,दि.८(punetoday9news):- पुणे शहरातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या विचारात घेता पुणे मनपातर्फे शहरातील विविध भागात ९ ccc ( covid care centre ) सुरू करण्यात आले आहेत.
त्यापैकी रक्षकनगर क्रिडा संकुल , खराडी , बनकर शाळा , हडपसर , संत ज्ञानेश्वर वसतीगृह , येरवडा व गंगाधाम अगिशमन विभाग इमारत , बिबवेवाडी ही कोव्हीड केअर सेंटर १२५० बेडच्या क्षमतेने सुरू असून त्यामध्ये ५८९ पेशंट उपचार घेत असून ६६१ खाटा सध्या उपलब्ध आहेत.
तसेच ॲग्रिकल्चर कॉलेज , होस्टेल , शिवाजीनगर , श्री शिवछत्रपती क्रिडा संकुल , होस्टेल , बालेवाडी , एस.एन.डी.टी. कॉलेज , कर्वे रोड , डॉ . बाबासाहेब आंबेडकर मुलांचे होस्टेल , येरवडा , डॉ . बाबासाहेब आंबेडकर होस्टेल , घोले रोड , पुणे मनपा इ . ५ कोविड केअर केंद्रे तयार असून त्याची क्षमता १९०० असून या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे . तसेच आगामी काळात रूग्णांची वाढती संख्या विचारात घेता सिंहगड इन्स्टिट्यूट , वडगाव बु. , ट्रिनिटी कॉलेज – कोंढवा , सीओईपी होस्टेल – शिवाजीनगर , शासकीय तंत्रनिकेतन – शिवाजीनगर , औंध आयटीआय , फर्ग्युसन कॉलेज – शिवाजीनगर , निकमार इन्स्टिट्युट- बालेवाडी , नंदन ॲक्युरा , बाणेर , गणेशकला क्रिडामंच , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हॉल ही ११ ccc ही केंद्रे कार्यान्वीत करण्यात येत असून त्यांची क्षमता ४७०० आहे .
या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे . पुणे मनपामार्फत सुरू करण्यात आलेल्या ccc मध्ये रूग्ण दाखल होण्याकरीता DM सेलमध्ये नोंदणी करणे वा कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक नसून त्या रूग्णांच्या घरी स्वतंत्र खोली , स्वतंत्र प्रसाधन गृह, शौचालय उपलब्ध नसेल तर अशा रूग्णांना पुणे मनपाच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये आपला कोव्हीड टेस्टचा रिपोर्ट दाखवून दाखल होता येईल , त्या करीता कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही.
अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
Comments are closed