पिंपरी, दि.९( punetoday9news):- रेमडेसिवीर इंजेक्शन रूग्णालयाबाहेर ॲडमिट असलेल्या रूग्णांना अधिक किंमतीने विकत असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातील तीन रूग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या तीन रूग्णालयांमध्ये आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल यांचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलचे अधिष्ठीता तथा वैद्यकिय अधिक्षक यांचा समावेश आहे.
सध्याच्या परिस्थितीत रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीच्या अशा प्रथेमुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याची सखोल चौकशी करुन पुढील ४८ तासात झालेल्या घटनेचा अहवाल द्यावा असे नोटीसीत नमुद केले आहे.
Comments are closed