पुणे, दि. ९(punetoday9news):- राज्यात कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या इतक्या झपाट्याने वाढलेली असतानाच आता कोरोना अधिकच गंभीर वळणावर आला असून, परिस्थिती आणखी भयावह होण्याचीही चिन्हे आहेत. पुण्यातील कोरोनाची सद्यस्थिती गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून (दि. 9) करण्यात येत आहे. या संदर्भातील नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
असे असतील नियम:-
– विकेंड लॉकडाऊन मध्ये दूध केंद्र (सकाळी 6 ते सकाळी 11) सुरू राहील
– वैद्यकीय सुविधा सुरू राहणार
– भाजीपाला दुकान / मंडई बंद
– हॉटेल, बार, रेस्टॉरंट मधून घरपोच पार्सल सेवा मिळणार
– स्विगी आणि झोमॅटो यांच्यामार्फत पार्सल सेवा सुरू राहील
– सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत मद्य विक्रीचे दुकान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाप्रमाणे घरपोच सेवा देणार
– घरेलू कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी, जेष्ट नागरीक, वैद्यकीय मदतनीस यांना सर्व दिवस सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत प्रवास करता येईल
– स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मेस मधून सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत पार्सल घेता येणार
– PMPL सेवा अत्यावश्यक सेवा वगळून शनिवार रविवार बंद राहणार
– अत्यावश्यक सेवा कारणास्तव ओला / उबेर सुरू राहणार
– कामगारांना प्रवास करताना RTPCR प्रमाणात सोबत बाळगावे लागणार
– कोरोना नियम पाळून औद्योगिक वसाहत सुरू राहणार
Comments are closed