पुणे, दि.९( punetoday9news):- पुणे महानगरपालिकेमध्ये नवीन २३ गावांच्या समावेशाबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनाबाबतच्या अनुषंगाने एकूण ४९१ अर्जावर सुनावणीचे कामकाज १९ एप्रिल व २० एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती पुणे विभागाचे नगरपालिका प्रशासनचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
पुणे महानगरपालिकेमध्ये नवीन २३ गावांचा समावेश करण्याची अधिसूचना नगर विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचेमार्फत प्रसिध्द करणेत आली होती. त्याकामी नागरिकांच्या प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी नगरविकास विभाग मा.उपसचिव यांचे पत्र क्र.पीएमसी-२०२०प्र.क्र.३२२/नवि-२२, १५ मार्च २०२१ अन्वये हरकती व सूचनांचा छाननी करून संबंधीतानां सुनावणी देण्याकरीता शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त, पुणे विभाग पुणे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
सुनावणीचे कामकाज दिनांक १९ एप्रिल २०२१ ते २० एप्रिल २०२१ या कालावधीत होणार आहे. गावनिहाय प्राप्त अर्जावर १९ एप्रिल रोजी सुस-१, कोपरे-१,नऱ्हे-१,वडाची वाडी-१,नांदोशी-१, किरकीटवाडी-१, होळकरवाडी-२, मांजरी बु-५, कोळेवाडी-५,वाघोली-५, सर्वसाधारण अर्ज-११,नांदेड-६८ तसेच २० एप्रिल रोजी पिसोळी-३८९ असे एकूण ४९१ अर्ज प्राप्त झाले आहेत. या हरकतीवर सुनावण्या घेण्यात येणार आहेत.
याबाबतचा तपशीलवार नियोजित कार्यक्रम संबंधित गावातील चावडीवर व ग्रामपंचायत कार्यालय येथे जाहिरपणे लावण्यात येणार आहे. तसेच हरकतदारांना वैयक्तिकरित्या नोटीसाही देण्यात येणार आहेत. वरील कालावधीत नमुद केलेल्या गावामधील हरकतदारांनी नियोजित वेळेत, दिनांकास व ठिकाणी उपस्थित राहणेबाबत संबंधीताना आवाहन केले असल्याची माहितीही प्रसिध्दी पत्रकानव्ये दिली आहे.
Comments are closed