नागरिकांनो नियम पाळणार नसाल तर दंड भरा.
पुणे,दि.१०( punetoday9news):- पुणे शहरात महानगरपालिकेच्या वतीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. त्यानुसार शुक्रवार दि. 9 एप्रिल रोजी पुणे मुंबई रस्त्यावरील वाकडेवाडी येथील कॅलिबर बिझनेस सपोर्ट सव्हिसेस प्रा.लि या कंपनीत महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता सदर कंपनीतील ८७ कर्मचारी काम करत असताना सामाजिक अंतर पाळल्याचे आढळुन आले नाही. त्यानुसार या कंपनीला ८७ हजार रु. दंड करण्यात आला आहे.
तसेच यानंतर नियम न पाळल्यास कंपनी सील केले जाईल अशी ताकीद देण्यात आली आहे तसेच मास्क न वापरणार्यावर १९ जणावर कारवाई करण्यात आली. असा एकुण १००१८० दंड आकारण्यात आला..
महापालिकाने आखुन दिलेल्या नियमानुसार आस्थापना चालू ठेवाव्यायात अन्यथा कोविड प्रतिंबधासाठी अजुन कारवाई कठोर करण्यात येईल असे प्रतिपादन सहा.आयुक्त आशा राऊत यांनी केले आहे.
या कारवाईस महापालिका सहाय्यक आयुक्त आशा राऊत, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक आय.एस.इनामदार, सुनिल कांबळे, आरोग्य निरिक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी व सहाय्यक राजेश अडागळे हे उपस्थित होते.
Comments are closed