मुंबई, दि.१०(punetoday9news):- लसीचा मर्यादित साठा असूनही महाराष्ट्र राज्याने आजपर्यंत 97 लाखांहून अधिक नागरिकांना लसीकरण केले आहे. देशात सर्वाधिक लसीकरण करून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर सातत्य राखून आहे.
काल दिवसभरात सुमारे 3 लाख जणांना लस देण्यात आली असून आकडेवारी अंतिम होईस्तोवर त्याहीपेक्षा जास्त असेल.
महाराष्ट्राकडे लसीचे सुमारे 10 लाख डोसेस होते. शुक्रवार 4.59 लाख डोस मिळाले आहेत.
Comments are closed