मुंबई,दि.१२(punetoday9news):-  बारावीच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या वर्षा गायकवाड यांची माहिती कुणाच्या वाढत्या प्रभावाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये आज हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून दहावीची परीक्षा जून अखेरीस व बारावीची परीक्षा मे महिन्यामध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वतः ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेऊन परीक्षा पुढे ढकलल्या असल्याने विद्यार्थ्यांनाही अधिक अभ्यासासाठी वेळ मिळाला आहे. राज्य बोर्डाच्या (SSC , HSC) परीक्षा पुढे ढकलल्या असून त्याच धर्तीवर इतर बोर्डाच्या ही परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात त्यासंबंधित सूचना त्या बोर्डांना देण्यात येणार असल्याची माहितीही शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे.

 

 


Comments are closed

error: Content is protected !!