पुणे, दि.12( punetoday9news):- पुणे महानगरपालिकेमध्ये नवीन २३ गावांच्या समावेशाबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या एकूण ४९१ हरकती व सुचनांबाबत अर्जावर कोरोना संसर्गाच्या सद्यपरिस्थितीमुळे व नागरीकांच्या सुरक्षिततेचे दृष्टीने सुनावणीचे कामकाज संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे नियोजन करण्यात आल्याचे पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कळविले आहे.
१९ एप्रिल रोजी सुस-१,कोपरे-१,नऱ्हे-१,वडाची वाडी-१,नांदोशी-१,किरकीटवाडी-१, होळकरवाडी-२, मांजरी बु-५, कोळेवाडी-५,वाघोली-५, सर्वसाधारण अर्ज-११,नांदेड-६८ तर २० एप्रिल रोजी पिसोळी-३८९ अशा ४९१ प्राप्त अर्जावर ऑनलाईन पध्दतीने सुनावणी घेण्यात येणार आहे.
सुनावणीसाठी ऑनलाईन लिंक संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार असून त्याकरीता स्वतंत्र स्लॉट उपलब्ध करून दिले जातील. तरी त्याच वेळी सुनावणीसाठी त्या ठिकाणी कोरोना संदर्भातील नियमांचे पूर्ण पालन करुन उपस्थित रहाणेबाबत संबंधितांना आवाहन करणेत येत आहे. ऑनलाईन सुनावणीसाठी नेमण्यात आलेल्या स्लॉटची माहिती संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाचे नोटीस बोर्डवर प्रसिध्द करणेत येईल. तसेच संबंधीत हरकतदार यांना वैयक्तिकरित्या नोटीसा देण्यात येणार असून सुनावणीसाठी उपस्थित रहावायाचे ठिकाण नोटीशीमध्ये नमुद करण्यात येणार आहे, असेही विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कळविले आहे.
Comments are closed