• मृत्यूचे प्रमाण 2.2 %

• पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.45 %

पुणे, दि. 13( punetoday9news):-  पुणे विभागातील 7 लाख 72 हजार 992 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 9 लाख 15 हजार 283 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 23 हजार 827 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 18 हजार 464 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.2 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.45 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 6 लाख 58 हजार 14 रुग्णांपैकी 5 लाख 47 हजार 581 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 99 हजार 729 आहे. कोरोनाबाधित एकूण 10 हजार 704 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.63 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 83.22 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 74 हजार 348 रुग्णांपैकी 63 हजार 838 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 556 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 954 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 72 हजार 138 रुग्णांपैकी 60 हजार 922 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 85 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 131 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 56 हजार 80 रुग्णांपैकी 50 हजार 179 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 49 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 852 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 54 हजार 703 रुग्णांपैकी 50 हजार 472 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 408 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 823 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 12 हजार 384 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 9 हजार 621, सातारा जिल्ह्यात 1 हजार 16, सोलापूर जिल्ह्यात 913 , सांगली जिल्ह्यात 526 तर कोल्हापूर जिल्ह्यात 308 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण:- 
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 9 हजार 742 आहे.

पुणे जिल्हयामध्ये 8 हजार 151

सातारा जिल्हयामध्ये 402

सोलापूर जिल्हयामध्ये 813

सांगली जिल्हयामध्ये 277 

कोल्हापूर जिल्हयामध्ये 99 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 55 लाख 57 हजार 564 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 9 लाख 15 हजार 283 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Comments are closed

error: Content is protected !!