दिल्ली,दि.१९( punetoday9news):- केंद्र सरकारने आज महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला करोनाची लस दिली जाणार आहे. १ मे पासून हे लसीकरण सुरू होणार असून लस उत्पादकांना ५० टक्के साठा राज्य सरकारला द्यावा असे सांगण्यात आले आहे.
देशात करोनावरील लसीकरणासाठी सरकारी केंद्र आणि खासगी रुग्णालयामध्ये लस घेता येणार आहे. सरकारी केंद्रांवर मोफत लस दिली जात आहे. तर खासगी रुग्णालयात एका डोससाठी २५० रुपये आकारले जात आहेत.
दरम्यान, आज (सोमवार) पंतप्रधानांची काही औषध कंपन्यांसोबत देखील बैठक झाली आहे. भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लस दिल्या जात आहेत. स्पुटनिक लसीलाही आपात्कालीन मंजुरी देण्यात आली. त्यामुळे लसीकरण मोहीमेला येत्या दिवसात वेग येणार आहे
मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार.
काही दिवसांपूर्वीच मी देशातील 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली होती. आज केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून 18 वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला, त्यासाठी प्रधानमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
Comments are closed