पिंपरी,दि .२०(punetoday9news):- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने लावलेल्या लॉकडाऊनच्या काळात कष्टकरी लघु उद्योजक व्यावसायिकांना हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी वर्गाला झळ सोसावी लागत आहे. यामुळे दापोडी येथील डी.बी.एन.संघटना व संदीप गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. 

या मदतीमुळे कष्टक-यांना दिलासा मिळत आहे.
दापोडी हा बहुसंख्य दाट लोकवस्ती असलेला भाग आहे. लॉकडाऊनमुळे फेरीवाले, स्नॅक्स सेंटर, बांधकाम मजूर, घरकामगार असे छोटे- मोठे उद्योग करून गुजराण करणा-यांना गतवर्षापासून मोठी आर्थिक ओढाताण सहन करावी लागत आहे.

सध्या कोरोनाच्या दुस-या लाटेत गतवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्वसान्यांना स्थानिक सामाजिक संस्था, दानशुर यांच्याकडून मदतीचे सहकार्य होईल ही अपेक्षा होती. मात्र सध्या मदतीचे हात पुढे येताना दिसत नसल्याने आम्ही येथील पाचशे कुटूंबांना सर्व खबरदारी व नियमांचे पालन करत गेली तीन दिवसांपासून जिवनावश्यक साहित्य वाटप करत असल्याचे संदीप गायकवाड, मनिषा गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी रामभाऊ उप्पर, नितिन गायकवाड,गिरिश घाडगे,मन्सुर नदाफ,विशाल जाधव आदी उपस्थित होते.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!