पिंपळे गुरव, दि. २१( punetoday9news):- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने संपूर्ण शहरात हाहाकार माजला असताना प्रशासनाने विविध उपाययोजना चालू केल्या आहेत. मात्र नागरिक, सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्लाझ्मा दान उपक्रम पिंपळे गुरव येथील संजय मराठे व विजय गायकवाड यांनी सुरू केला आहे.
या उपक्रमासाठी सोशल मिडियाचा वापर करून रूग्णांची मदत केली जात आहे. कोरोनातून पूर्ण पणे बरा झालेला प्रत्येक व्यक्ती इतर कोरोना बाधित रूग्णाचे प्राण वाचू शकतो. हा हेेतू लक्षात घेवूून दिवसरात्र युवक झटत आहेत.
प्लाझ्मा दान करण्यासाठी शहरातील कोरोनातुन बरे झालेले किंवा उपचार घेत आहेत अशा नागरिकांनी खालील माहिती स्वतः भरावी. असे आवाहन करण्यात आले आहे.
प्लाझ्मा देण्यासाठी
नाव:-
वय:-
पत्ता:-
रक्त गट :-
कोरोना झाल्याची तारीख:-
कोरोनातून बरे झाल्याची तारीख:-
प्लाझ्मा देण्यास तयार आहात का:-
नसल्यास कारण:-
मोबाइल नं. :-
प्लाझ्मा दान करणाऱ्यांसाठी ने – आण करण्यासाठी चार चाकी वाहनाची सोय करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी संजय मराठे 9850209850 या क्रमांकावर संपर्क साधण्याचेे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed