पिंपरी ,२१ ( punetoday9news):-  आयपीएल मध्ये चेन्नईकडून खेळणारा सांगवीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि  डु प्लेसिस यांनी चेन्नईच्या डावाची दमदार सुरुवात केली. पहिल्या ५ षटकात या दोघांनी चेन्नईच्या ४४ धावा फलकावर लावल्या. मागील काही सामन्यांपासून फ्लॉप ठरलेल्या ऋतुराज गायकवाडने ११व्या षटकात आयपीएलमधील आपले पाचवे अर्धशतक पूर्ण केले. आक्रमक झालेल्या ऋतुराज अर्धशतकानंतर बाद झाला.

फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने त्याला १३ व्या षटकात झेलबाद केले. ऋतुराजने ६ चौकार आणि ४ षटकारांसह ६४ धावांची खेळी केली. ऋतुराज आणि प्लेसिसने पहिल्या गड्यासाठी ११५ धावांची भागीदारी रचली. ऋतुराज बाद झाल्यानंतर प्लेसिसने अर्धशतक पूर्ण केले.

 

Comments are closed

error: Content is protected !!