• मृत्युमुखी पडलेल्या रूग्णांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रूग्णांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत.
• शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती.
• राज्यातील सर्व रुग्णालयांचे ऑडिट करण्याची राज ठाकरे यांनी केली मागणी.
• मृतांच्या नातेवाईकांची रूग्णालयाबाहेर अडवणूक.
विरार,दि.२३( punetoday9news):- पालघर जिल्ह्यातल्या विरार येथील कोव्हिड हॉस्पिटलला आग लागून यात १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे . या आगीची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत .
विरारमधल्या विजय वल्लभ हॉस्पिटलच्या इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये रात्री उशीरा आग लागली . यावेळी रुग्णालयात एकूण १७ रुग्ण होते . त्यापैकी १४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती विरार कोव्हिड कंट्रोल रूमने दिली आहे. आता ही आग पूर्णपणे आटोक्यात आल्याचे अग्निशमन विभागाने म्हटले आहे . शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे . मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा . हे खासगी रुग्णालय आहे , याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत .
विरार येथील विजय वल्लभ रूग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रूग्णांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रूग्णांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 23, 2021
Comments are closed