• कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य.
• कृषि विषयक पदवी,पदविका शैक्षणिक पात्रता आवश्यक.
पुणे,दि. २४( punetoday9news): – जिल्ह्यामध्ये कृषि निविष्ठा विक्रेत्यांपैकी काही निविष्ठा विक्रेत्यांकडे कृषि विषयक पदवी, पदविका शैक्षणिक अर्हता नसते. या अनुषंगाने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शैक्षणिक अर्हता नसणाऱ्या विक्रेत्यांनी वेळेत आवश्यक तो अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य आहे, अन्यथा त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण होणार नाही, असे प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी कळविले आहे.
निविष्ठा विक्रेत्यांमध्ये शैक्षणिक अर्हतेबाबत संभ्रम होत असतो. ज्यांच्याकडे सर्व परवाने असून शैक्षणिक अर्हता प्राप्त नाही, त्यांनी कृषि निविष्ठा विक्रेत्यांकरिता कृषि पदविका अभ्यासक्रम (DAESI-Diploma in Agriculture Exetension Services for Input Dealers) करणे अनिवार्य आहे, अन्यथा त्यांचे परवाने रद्द होवू शकतात.
ज्या परवानाधारकाकडे फक्त खताचा परवाना आहे, अशांनी केवळ INM- Certificate Course on Integrated Nutrient Management for fertilizer Dealers अभ्यासक्रम करणे गरजेचे आहे. ज्या परवानाधारकाकडे फक्त किटकनाशकांचा परवाना आहे, अशांनी केवळ CCIM-Certificate Course on Insecticide Management अभ्यासक्रम करणे गरजेचे आहे.
जास्तीत जास्त कृषि निविष्ठा परवानाधारकांनी आवश्यकतेनुसार नोडल प्रशिक्षण संस्थेमध्ये नोंदणी करुन अभ्यासक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन आर. डी. साबळे, प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे कार्यालय, दुरध्वनी क्रमांक – 020-25530431 या क्रमांकावर संपर्क साधावा.
Comments are closed