पिंपरी,दि.२५(punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रूग्णांची वाढली संख्या पाहता नियोजित उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून  महापौर माई ढोरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्लाझ्मा दान करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून १ हजार रुपये बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.  त्यासाठी पुढील क्रंमाकावर  संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्लाझ्मादान नाव नोंदणी संपर्क निलेश 9049613700, अक्षय 9527425202, जे.डी 9595150505.

आज कोरोना महामारीने भारतासह जगातील सर्व देश त्रस्त आहेत. सगळीकडे या महामारीने मानवजातीला हैराण करून सोडलेले आहे. वयस्कर व इतर दुर्धर आजार असणाऱ्यांना यातुन सावरण्यास त्रास होत आहे. तसेच त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असल्यामुळे त्यांचे दगावण्याचे प्रमाणही जास्त आहे.

यावर उपाय म्हणून सद्यस्थितीत प्लाझ्मा दान योग्य उपचार ठरत आहे. ज्यांना कोरोना होऊन २८ दिवस पूर्ण झालेत अश्या सर्व सदृढ व सशक्त नागरिकांनी त्यांच्या शरीरात तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती प्लाझ्माच्या रूपात दिल्यास २ रूग्णांचे प्राण वाचवु शकतात. त्यासाठी
प्लाझ्मादान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेमडेसिव्हिर इंजेक्शन पेक्षाही जास्त प्रभावी प्लाझ्मा मानला आहे आणि तो आपल्या सर्वांकडे आहे. सर्व प्रकारे आपण मदत तर करतोच आहोत पण प्लाझ्मारूपी मदत ही खूप मोलाची असेल. प्रत्येक प्लाझ्मादान करणा-या व्यक्तीला महापौर माई ढोरे यांच्याकडून १,०००/- रू. बक्षिस रूपी मदत केली जाणार आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!