• पुणे येथील सांगवी परिसर महेश मंडळाने सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
• २ लाख रुपये किमतीचा वाटर फिल्टर प्लांट भेट.
पिंपरी,दि.२६(punetoday9news):- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आमदार निलेश लंके यांनी अकराशे बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे या केअर सेंटर साठी मदतीचा ओघ सुरू असून आमदार निलेश लंके करत असलेले काम थेट राज्य भर पोहोचले आहे त्यामुळे आमदार लंके यांच्या कार्यासप्रेरित होऊन व जाणीव फाउंडेशन वडनेर हवेली यांच्या पुढाकारातून सांगवी परिसर महेश मंडळ पुणे यांनी कोविड सेंटरसाठी रुग्णांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून २ लाख रुपये किमतीचा वाटर फिल्टर प्लांट भेट म्हणून दिला आहे.
सध्या तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे भाळवणी येथील कोविड केअर सेंटरमध्ये जवळपास ७०० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत त्या रुग्णांना बिसलेरी बॉटलने पाणीपुरवठा केला जात होता परंतु त्यावर लाखो रुपये खर्च येत असल्याने जाणिव फाउंडेशन वडनेर हवेली यांच्यामार्फत सांगवी परिसर महेश मंडळ पुणे यांना कोविड सेंटरसाठी फिल्टर प्लांट देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला त्यावर त्वरित सांगवी परिसर महेश मंडळ पुणे यांनी फिल्टर प्लांट बसवण्याची तयारी दर्शवत दि. 24 एप्रिल रोजी त्या प्लॉटचे लोकार्पण आमदार निलेश लंके यांच्या हस्ते केले.
यावेळी सांगवी परिसर महेश मंडळाचे अध्यक्ष सतीश लोहिया, मनोज अटल, निलेश अटल, मधुर नावंदर, कारभारी पोटघन, सतीश भालेकर, सुभाष भालेकर आदी उपस्थित होते.
भाळवणी येथील कोविड सेंटर ला अनेक दाते मदत करत आहे त्यामध्ये आर्थिक वस्तू भाजीपाला आदी स्वरूपामध्ये मदत मिळत आहे परंतु सांगवी परिसर महेश मंडळ यांनी आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेला कोविड सेंटर मधील रुग्णांना स्वच्छ पाणी पुरवठा मोफत मिळावा म्हणून वाटर फिल्टर प्लांट दिला आहे कोविड सेंटर वरील पाण्यावरील खर्च पूर्णपणे कमी झाला आहे.
प्लांट बसवणे आधी जवळपास 700 रुग्णांना रोज 2800 पाणी बॉटल पाणी लागत होते त्यावर दैनंदिन 28 हजार रुपये खर्च येत होता महिन्याचा खर्च 8 लाख 68 हजार इतका होता मात्र प्लांट बसवल्यानंतर हा खर्च महिन्याला 1 लाख 86 हजार रुपये वर आला आहे त्यामुळे 6 लाख 82 हजार रुपयांची महिन्याला बचत या प्लांट मुळे होणार आहे.
• आमदार लंके यांच्या सामाजिक कामात योगदान
आमदार निलेश लंके यांचे कोविड सेंटर म्हणजे रुग्णांसाठी वरदान आहे आज शहरामध्ये अनेक रुग्ण वाढलेले असताना सेवा मिळत नाहीत मात्र येथे रुग्णांची कुटुंबातील सदस्य प्रमाणे सेवा होत आहे अनेक रुग्ण दिवसभर भरती होण्यासाठी येत असल्याने व त्यांची काळजी घेण्यासाठी आमदार लंके स्वतः उपस्थित असतात त्यांचे हे काम पाहूनच आम्ही याठिकाणी आपलेही या सामाजिक कार्यात योगदान असावे म्हणून वाटर फिल्टर प्लांट दिला आहे.
– सतीश लोहिया
अध्यक्ष सांगवी परिसर महेश मंडळ पुणे
• फिल्टर प्लांट मुळे लाखोंची बचत
कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांना स्वच्छ पाणी बॉटल मार्फत दिले जात होते त्याला लाखो रुपये खर्च येत असल्याने जाणिव फाउंडेशन च्या माध्यमातून यापूर्वी सांगवी परिसर महेश मंडळ यांनी वडनेर हवेली साठी वाटर फिल्टर प्लांट दिला आहे त्यामुळे त्यांना येथील परिस्थिती सांगत आमदार निलेश लंके यांचे कामाबद्दल माहिती दिली त्यांनी त्वरित या सेंटरसाठी फिल्टर प्लांट बसविण्यासाठी पुढाकार घेतला यामुळे लाखो रुपयांची बचत होणार आहे.
– सतीश भालेकर
इंजि.वडनेर हवेली
• सांगवी परिसर महेश मंडळाची मदत सेवाभाव म्हणून मोठी.
तालुक्यामध्ये अकराशे बेडचे कोविडसेंटर सुरू असून या कोविड सेंटरमध्ये तालुक्यासह जिल्हा व जिल्हा बाहेरून रुग्ण सध्या उपचार घेत आहेत येथे रुग्ण कुठून आला हे महत्त्वाचे नसून त्याची सेवा करण्याचे काम प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते अविरतपणे करत आहेत सांगवी परिसर महेश मंडळ यांनी दिलेली हीच मदत सेवाभाव म्हणून खूप मोठी आहे.
आमदार निलेश लंके.
Comments are closed