• सत्य,अपरिग्रह,मैत्री, बंधुता, प्रेम, अहिंसा, करुणा व जीवदया ची शिकवण देणाऱ्या महावीर स्वामींच्या जयंती निमित्त सामाजिक उपक्रम.
भोसरी,दि.२६( punetoday9news):- भगवान महावीरस्वामी जयंती च्या निमित्ताने भोसरीतील आनंद युवा मंच व गौतमलब्धि फौंडेशन ने रक्तदान शिबिराचे आयोजन श्री जैन स्थानक भवन, भोसरी येथे केले होते.
सत्य, अपरिग्रह, मैत्री, बंधुता, प्रेम, अहिंसा, करुणा व जीवदया ची शिकवण देणाऱ्या महावीर स्वामींच्या जयंती निमित्त जैन बांधवांनी अनेक सामाजिक उपक्रम घेतले. कोरोना संकटाचे सावट व भिती प्रत्येकाच्या मनामधे आहे. हॉस्पिटल मधे बेडस्, ऑक्सीजन, रक्ताची प्रचंड कमतरता भासत आहे.
अशावेळी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही भगवान महावीर जयंती चे औचित्य साधुन रक्तदान शिबिराचे आयोजन केले. लसीकरण व कोरोनाच्या पार्शभूमी असताना देखील या शिबिरात अनेकांनी सहभाग घेतला. पिंपरी येथील पिंपरी सेरॉलॉजिकल इंस्टीट्यूट ब्लड सेंटर च्या सहयोगाने सर्व प्रशासनिक नियमांचे पालन करुन हे शिबीर उत्तम पणे पार पडले.
यावेळी श्री संघ भोसरीचे पदाधिकारी, गौतमलब्धि फौंडेशन चे गौतम नाबरिया, प्रमोद कटारिया, हर्षद गेलडा, प्रितीश सुराणा, कोमल नाबरिया, वरिष्ठ पोलिस निरिक्षक जितेंद्र कदम, सामाजिक कार्यकर्ते प्रज्योत फुगे,जेष्ठ समाजसेविका व फ्रिडम लाईफ फौंडेशन च्या शैलजा चौधरी यांनी सदिच्छा भेट दिली.
सामाजिक बांधिलकीची जपत आनंद युवा मंच व गौतमलब्धि फौंडेशन भोजापुर (भोसरी) अनेक उपक्रम राबविते. कोरोना काळात गरिबांना फुड्स पॅकेट, शासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी,स्वच्छता कर्मचारी यांना फूूड्स केट, पाणी, अल्पोपहार ची व्यवस्था केली. रक्तदान शिबिरात फुड्स पॅकेट चे वितरण केले.
Comments are closed