• राज्यातील पहिला प्रयोग ; अभ्युदय फाउंडेशनचा पुढाकार

अकोला,दि.२७( punetoday9news):-  कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नियमित वाफ घेणे महत्वाचे आहे. वाफेचे महत्व नागरिकांना व्हावे तसेच याबाबत जनजागृती करण्याचा उपक्रम अभ्युदय फाउंडेशनने हाती घेतला आहे. या धर्तीवर राज्यातील पाहिले आयुर्वेदिक स्टीम सेंटर पातूर येथे उभारण्यात आले आहे. नागरिकांना या सेंटरवर निशुल्क वाफारा देऊन त्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

पातुरच्या अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने कोरोना काळात अनेक सेवाभावी उपक्रम राबविले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने आयुर्वेदिक स्टीम सेंटर पातूर येथे उभारले आहे. या सेंटरचा लोकार्पण सोहळा सोमवारी (दि. 26 एप्रिल रोजी ) पार पडला. पातुरचे तहसीलदार दीपक बाजड यांच्या हस्ते या अभिनव उपक्रमाचे उदघाट्न पार पडले. यावेळी पातूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सोनाली यादव, नायब तहसीलदार ए. एफ. सैय्यद, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवाळे साहेब, ग्रामविस्तार अधिकारी राहुल उंद्रे, अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव बंटी गहिलोत उपस्थित होते. पहिल्याच दिवशी नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पातूर येथिल तहसील कार्यालय येथे या सेंटर चे उदघाट्न पार पडले. उद्यापासून हे आयुर्वेदिक स्टीम सेंटर नगर परिषद शाळा क्र.२ येथे नागरिकांसाठी निशुल्क सुरु राहणार आहे. या अभिनव सेंटर च्या उभारणीसाठी अभ्युदय फाउंडेशनचे डॉ. संजयसिंह परिहार, प्रवीण निलखन, शुभम पोहरे, प्रा.चंद्रमणी धाडसे, प्रा. नरेंद्र बोरकर, शुभम उगले, विलास देवकर, संतोष लसनकर आदींनी अथक परिश्रम घेतले. या सेंटरसाठी बालाजी मेडिकलचे संचालक शुभम उगले यांनी सहकार्य केले.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!