• पुणे विभागातील 9 लाख 48 हजार 396 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.

• मृत्यूचे प्रमाण 1.91 टक्के.

पुणे, दि. 27(punetoday9news):- पुणे विभागातील 9 लाख 48 हजार 396 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 11 लाख 20 हजार 939 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 51 हजार 130 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 21 हजार 413 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.91 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.61 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 7 लाख 99 हजार 232 रुग्णांपैकी 6 लाख 88 हजार 158 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 98 हजार 709आहे. कोरोनाबाधित एकूण 12 हजार 365 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.10 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 95 हजार 56 रुग्णांपैकी 73 हजार 690 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 19 हजार 193 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 173 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 92 हजार 402 रुग्णांपैकी 75 हजार 846 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 935 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 621 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 70 हजार 332 रुग्णांपैकी 56 हजार 645 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 544 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 143 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 63 हजार 917 रुग्णांपैकी 54 हजार 57 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 749 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 11 हजार 4 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 6 हजार 46, सातारा जिल्ह्यात 1 हजार 437, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 537, सांगली जिल्ह्यात 1 हजार 141 तर कोल्हापूर जिल्ह्यात 843 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 834 आहे. पुणे जिल्हयामध्ये 8 हजार 823, सातारा जिल्हयामध्ये 338, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 327, सांगली जिल्हयामध्ये 935 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 411 रुग्णांचा समावेश आहे.
विभागामध्ये लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्हयातील 20 लाख 83 हजार 288, सातारा 5 लाख 57 हजार 935, सोलापूर 3 लाख 8 हजार 890, सांगली 4 लाख 78 हजार 505 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 3 लाख 75 हजार 507 नागरिकांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 64 लाख 89 हजार 254 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 11 लाख 20 हजार 939 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!