पिंपरी, दि २८(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा रूग्णासहित नातेवाईकांची धावपळ करवत आहे त्यात काही रूग्णवाहिका चालक मनमानी पद्धतीने भाडे आकारूण आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारी येत होत्या.

यावर विभिन्न स्तरातून टीका झाल्याने प्रशासन जागे होवून रूग्णवाहिकेचे दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वतः अशा प्रकारे लुट करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येण्याचा इशारा दिला आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!