पिंपरी,दि.२८ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भावाने हाहाकार माजला असताना प्रशासनाने विविध उपाययोजना चालू केल्या आहेत तसेच प्लाझ्मा दान करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. याच आवाहनास प्रतिसाद व स्वतःची समाजाच्या दृष्टीने कृतज्ञतेची भावना कृतीतून दाखवून देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे शिक्षक मिलिंद संधान यांनी प्लाझ्मा दान करून इतरांना आदर्श निर्माण केला आहे.
फक्त फोटोसेशन पुरता सल्ला देणारे गर्दीने असतात मात्र प्रत्यक्षात कृती अंमलात आणताणा हीच गर्दी हवेत विरघळून जाताना आपण पाहतो. मात्र सामाजिक बांधिलकी जपत आदर्शवत निस्वार्थपणे कृती करत राहणारे तुरळक प्रमाणात आढळतात. यातीलच एक उदाहरण म्हणजे जनता शिक्षक संस्थेतील दापोडी शाखेतील शिक्षक मिलिंद संधान होय. हे एक शिक्षक असले तरी पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी लेखनीच्या जोरावर वेगळा ठसा उमटवला आहे. एकीकडे ज्ञानदान करून आदर्श नागरिक घडवण्याचे कार्य तर दुसरीकडे पत्रकारितेच्या माध्यमातून समाजास योग्य दिशा देण्याचे कार्य निरंतर करत आहेत. समाजोपयोगी विविध उपक्रमात सहभागी होवून स्वतः इतरांना मार्गदर्शनकरत असतात. या कोरोना संकटात स्वतः स व कुटुंबियांना कोरोना झाल्यानंरही स्वतः सहित कुटुंबातील इतर सदस्यांची आत्मविश्वासाने काळजी घेत कोरोनावर मात केली. व पुन्हा एकदा स्वतः स मदतकार्यात झोकून दिले.
प्लाझ्मा दान करण्यासाठीचे आवाहन स्वीकारून प्लाझ्मा दान करून इतर रूग्णाला जीवनदान देण्याचे सत्कार्यही केले तसेच प्रशासनाने केलेल्या आवाहनास इतर नागरिकांनीही प्रतिसाद द्यावा असे त्यांनी आवाहन केले आहे.
प्लाझ्मा दान कोण करू शकतात ?
ज्यांचे वय १८ ते ६० दरम्यान आहे , ज्यांचे वजन ५० किलोपेक्षा जास्त आहे , जी व्यक्ती कोरोना आजारातून पूर्ण बरी झालेली असून डिश्चार्ज किंवा होम क्वारंटाईनच्या सुमारे २८ दिवसांनंतर प्लाझ्मा दान करू शतात . प्लाझ्मा दान करणाऱ्याच्या अँटिबॉडीज आधी टेस्ट केल्या जातात. प्रमाण योग्य असल्यास प्लाझ्मा घेतला जातो.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने प्लाझ्माची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे . संकलित प्लाझ्मा आणि रुग्णांची संख्या यांचे व्यस्त प्रमाण झाल्यामुळे प्लाझ्मा मिळणे अवघड झाले आहे . मात्र योग्य वेळी योग्य माहिती मिळाल्यास व प्लाझ्मा दानाच्या आवाहनानुसार नागरिकांनी प्लाझ्मा दान करून इतरांना जीवनदान द्यावे.
Comments are closed